मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन अडकूर येथे उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2023

मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन अडकूर येथे उत्साहात संपन्न

मराठा सेवा संघ वर्धापन दिनी अडकूर येथे जिजाऊ, शिवराय, शंभूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मराठा सेवा संघाचे चंदगड तालुक्यातील पदाधिका

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        अडकूर (ता. चंदगड) येथे मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. अडकूर बाजार पेठ येथे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला.

       यावेळी उपस्थित मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष शिवश्री संदीप राजाराम देसाई यांनी युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ३३ वर्षांपूर्वी मराठा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाने गेल्या ३३ वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. मागील ३३ वर्षात मराठा सेवा संघाच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊन सध्या ३२ कक्षांमार्फत संपूर्ण जगभर मराठ्यांच्या प्रगतीसाठी सेवा संघ झटत आहे, असे सांगितले. यावेळी उद्योग कक्ष तालुका अध्यक्ष शिवश्री विष्णू कंग्राळकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री प्रकाश इंगवले, मराठा सेवा संघ तालुका सचिव शिवश्री विजय आर्दाळकर, (गणुचीवाडी), सुनील कांबळे, राजेंद्र कापसे, अशोक आर्दाळकर, अशोक घोरपडे, अल्लाबक्ष जमादार आदींसह मराठा सेवा संघाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत  सदिप देसाई यांनी केले. आभार सचिव  विजय आर्दाळकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment