गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी पोलीस व एस. आर. पी. एफ. जवानांचे कुदनूर येथे पथसंचलन - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2023

गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी पोलीस व एस. आर. पी. एफ. जवानांचे कुदनूर येथे पथसंचलन

 

कुदनूर येथे अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकी निमित्त पथसंचलन करताना पोलीस व एस आर पी एफ चे जवान.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अति संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुदनुर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी चंदगड पोलीस व सीआरपीएफ जवानांच्या तुकडीने गावातील मुख्य मार्गावरून पथसंचलन केले. अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोन सण एकत्र आल्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.२० वाजता हे पथसंंचलन पार पडले. यात चंदगड व कोवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी, होमगार्ड व १ एस. आर. पी. एफ. प्लाटून सहभागी झाले होते. प्राथमिक शाळेनजीकच्या पिंपळकट्टा चौकापासून तळगुळी फाटा असे एक किलोमीटर पथसंचलन करण्यात आले.

     कुदनूर येथे ६ सार्वजनिक मंडळे असून यातील कार्यकर्त्यांना विसर्जन मिरवणूक शांततेत, फटाके मुक्त तसेच डॉल्बीमुक्त करण्याच्या सूचना ठाणे अंमलदार राज किल्लेदार यांनी दिल्या.  यावेळी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच गावातील मुस्लिम समाजाचे पुढारी, पोलीस पाटील नामदेव लोहार, तंटामुक्त समिती सदस्य, विविध मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. याकामी चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment