चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात उद्या आयुष्यमान भव सेवा पंधरवड्यानिमित्त आरोग्य मेळाव्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2023

चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात उद्या आयुष्यमान भव सेवा पंधरवड्यानिमित्त आरोग्य मेळाव्याचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयामध्ये `आयुष्यमान भव` सेवा पंधरवड्यानिमित्त साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

     या मेळाव्यामध्ये विशेष सेवा उपलब्ध होणार असून यामध्ये प्रसुती आणि स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया,  कान, नाक, घसा, नेत्रविकार, मामसोपचार यासारख्या विविध सेवा मिळणार आहेत. वयोगट १८ वर्षावरील सर्व पुरुष लाभार्थ्यांच्या असंसर्गजन्य आजारा संबंधी तपासण्या करण्यात येणार आहेत. असंसर्गजन्य रोगाच्या योग्य चाचण्या करुन निदान करुन व त्यांना उपचार देण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment