कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना चेअरमन दयानंद मोटुरे सोबत संचालक मंडळ
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची वार्षिक सभा नुकतीच चेअरमन दयानंद मोटुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्वागत संचालक बी. के. पाटील यांनी केले. अहवाल वाचन व्यवस्थापक पी. पी. पाटील यांनी केले.
गत आर्थिक वर्षात संस्थेचे भाग भांडवल रु. ४८,४६,८८५/- इतके असून संस्थेकडे रु.५,५४,९४,०००/- इतक्या ठेवी असून रु. ४,२०,३५,०००/- कर्ज वाटप केले आहे. तर रु. १६,०२,६१०/- नफा झाला आहे. यातून सभासदांना १०% लाभांश देणे सुरू केले आहे. सोने तारण कर्ज ९ टक्के दराने तर नियमित कर्ज १३ टक्के दराने उपलब्ध असल्याची माहिती चेअरमन मोटुरे यांनी यावेळी दिली. विविध परीक्षेत क्रमांक मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार संचालक बाळासाहेब वांद्रे, विरुपाक्ष गणाचारी, बंडू तोगले, शाकीर काजी, विष्णू गावडे, कल्लाप्पा वांद्रे, रवी पाटील, कृष्णा कांबळे, मनीषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत श्रीधर भोगण, पटेकर, वसंत पाटील, रामचंद्र पाटील, पांडुरंग शिंदे, अनंत पाटील यांनी सहभाग घेतला. व्हा चेअरमन उत्तम मुळीक यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment