होसूर येथे सत्वसिद्ध निर्मित पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2023

होसूर येथे सत्वसिद्ध निर्मित पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन

विसर्जनासाठी जमलेले भक्तगण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        होसुर (ता. चंदगड) येथे सत्वसिद्ध निर्मित पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. 

           याच गणेशमूर्तींचे आगमनही भजनाने करणेत आले होते. पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे प्रचार व प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरण पूरक सण साजरे करावेत. याकरिता होसुरचे सरपंच राजाराम दत्तात्रय नाईक, सुबराव रामचंद्र पवार, रवींद्र मारुती वर्पे, अमोल एकनाथ देसाई यांनी सहभाग घेतला आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्तींच्या प्रचार व प्रसार केल्याने या मूर्तींची संख्या पुढच्या वर्षी या मुर्तींना मागणी वाढणार आहे. प्रत्येक जण या पर्यावरण पूरक मूर्तीचे महत्त्व जाणून घेऊन त्याचेच पूजन करण्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने यावेळी गरज असल्याचे सांगण्यात आले. 

No comments:

Post a Comment