तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कागणी हायस्कूलचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2023

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कागणी हायस्कूलचे यश

संजना दिगंबर पाटील

 

श्रेया दिगंबर पाटील



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच राजगोळी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर संपन्न झाल्या. या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील उंच उडी स्पर्धेत संजना दिगंबर पाटील तर ६०० मीटर धावणे स्पर्धेत श्रेया दिगंबर पाटील या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही विद्यार्थिनी व्ही. के. चव्हाण- पाटील विद्यालय कागणीच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांना मुख्याध्यापक जी आर कांबळे, क्रीडा शिक्षक डी. एम. जाधव, पी बी तोरसकर, आर. के. नाईक, लतिका हगिदळे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment