तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारा सभा शिनोळी (ता. चंदगड) येथील संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
या सभेला तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलता ना आमदार राजेश पाटील म्हणाले, तालुक्यात औद्योगिकरण वाढवण्यासी प्रयत्नशिल आहे असून औद्योगिक वसाहतीत विविध विकास कांमासाठी 1 कोटी रुपये व २० लाख रुपयांचा निधी चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज या इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार राजेश पाटील यानी दिले.
प्रल्हाद जोशी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी उद्योजग व व्यापारी यांना येणाऱ्या अडी अडचणी यावर विचार व्यक्त केले. या यावेळी कृषीतज्ञ व भारत सरकारचे कृषी सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी MSME या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. या सभेला मोनापा पाटील, विलास देसाई, शंकर भेकणे, शेखर पाटील, शांताराम बेनके, मनोज हळदणकर, विजय कोकीतकर, सागर नेसरकर आदि मान्यवरांसह तालूक्यातील उद्योजक व व्यापारी उपस्थित होते. संस्थेचे सचिव दत्तात्रय पाटील यानीसंस्थेचा लेखा- जोखा मांडला. संस्थेचे उपाध्यक्ष सुधिर सावंत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment