जालना येथील घटनेचा चंदगडमधील मराठा समाजाने बोंब मारून केला निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2023

जालना येथील घटनेचा चंदगडमधील मराठा समाजाने बोंब मारून केला निषेध

चंदगड शहराच्या संभाजी चौकात मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज निषेध व्यक्त करताना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     काल अंतरवली (सराटी) जि. जालना येथे आमरण उपोषणाला बसणाऱ्या मराठा बांधवांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार करून महिला व लहान मुलांना मारण्यात आले. मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे शांततामय मार्गाने आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी मारहाण केली. या घटनेच्या आज चंदगड येथील छत्रपती संभाजी चौकात सकल मराठा समाजाने बोंब मारून निषेध कला.
  काल अंतरवली मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना पोलीसांनी मारहाण केली. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. याचा निषेध म्हणून शनिवारी सकाळी चंदगड येथील छत्रपती चौकात सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत बोंब मारून सरकारचा निषेध केला. याचवेळी आंदोलनकर्त्यांनी शिंदे - फडवणीस पवार सरकारचा निषेध केला. 
    तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर, राजाराम सुकये, शंकर मनवाडकर, कमलाकर सावंत, नगरसेवक अभिजीत गुरबे, सरपंच सौ. माधुरी सावंत- भोसले, कृष्णा पाटील, महादेव वांद्रे, अनिकेत घाडगे, शरद गावडे, अशोक पेडणेकर, विक्रम मुतकेकर, समीर चंदगडकर, नितीन गायचारे, संभाजी देसाई, संजय तारळेकर, महेश माने, महेश पाटील, रवळनाथ पडवळे, एकनाथ म्हाडगुत, शिवाजी कुट्रे व जोतिबा पाटील आदी मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.


No comments:

Post a Comment