तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय सैन्यदलात २८ वर्षे सेवा करून सुभेदार (कमांडो) पदावरून निवृत्त झालेले कोळींद्रे (ता. आजरा) येथील सुधाकर जानबा पाटील यांचा संपूर्ण कोळींद्रे गावाने सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढून सत्कार केला.
भारत मातेची सेवा हाच धर्म मानून देशात विविध ठिकाणी सेवा बजावलेल्या सुधाकर यांची सजवलेल्या गाडीतून संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व गल्यामध्ये ग्रामस्थांनी रांगोळीचा सडा टाकला होता. भजन, लेझिम व बँजो च्या सुमधूर देशभक्ती गितांच्या तालावर व फुलांची उधळण करत सुधाकर व सौ. सिमा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मराठी विद्यामंदिर समोर झालेल्या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत, गावातील विविध संस्था, मंडळे, कुटूंबिय, मित्र परिवार, गडहिंग्लज आजरा चंदगड तालूक्यातील व आजी -माजी सैनिक संघटना यांच्या वतीने सुधाकर व पत्नी सिमा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पो. पाटील रणजित परिट, उपसरपंच सदाशिव हेब्बाळकर, शंकर पाटील (अध्यक्ष) महादेव घुगरे, शिवाजी रेडेकर, पांडूरग वाईंगडे, सुभाष सावंत, महादेव भोगले, अशोक साळुंखे, परशराम मांगले, मारुती आंबूलकर, रामचंद्र गुडूळकर, सयाजी सावंत शिवाजी रेडेकर, रमेश कबीर आदि मान्यवर उपस्थित होते.
जशी आजपर्यंत देश सेवा केली तशीच इथून पुढे गावची सेवा करणार असल्याचे मनोगतात सुधाकर पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment