पार्ले शाळेला संगणक भेट देताना दुर्गवीरचे सदस्य.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांचेकडून केंद्रीय प्राथमिक शाळा पार्ले एक संगणक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पार्ले गावचे सरपंच मोहन झेंडे यांनी केले.
सदानंद सीताप यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान बाबत माहिती दिली. दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेमार्फत महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांवर दुर्गसंवर्धनाचे काम सातत्याने सुरू आहे. आपल्या चंदगड तालुक्यातील किल्ले कलानिधीगडावर गेले ६ ते ७ वर्षापासून दुर्गवीर प्रतिष्ठान चंदगड-बेळगाव सीमाभाग मार्फत प्रत्येक रविवारी गडावर श्रमदान मोहीम राबवल्या जातात. गेल्या अनेक वर्षात गडाला गडपण देण्याचं कार्य दुर्गवीर करत आहेत. जो कलानिधीगड (काळानंदीगड) तालुक्यातील मोजक्याच लोकांनी पाहिला होता. जो कलानिधीगड अजूनही अपरिचित होता. त्याच किल्ल्यावर आज बाहेरून इतिहास प्रेमी येऊ लागले आहेत. हे दुर्गवीरांनी घेतलेल्या कष्टामुळेच.
दरवर्षी दुर्गवीर प्रतिष्ठान दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप करत असते. गरीब दुर्गम व मागास समाजातील मुले शिकली पाहिजेत असा प्रयत्न या प्रतिष्ठानचा असतो. अमित जगताप आजचे विद्यार्थी हेच उद्याचे मावळे आहेत. देशाचे भविष्य आहेत असे सांगितले. संगणकाचा वापर विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी करावा असे दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसूरकर यांनी सांगितले व प्रतिष्ठानने संगणक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गावडे व मुख्याध्यापक अनिल पाटील यांचेकडे सुपुर्द केला.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मण गावडे, सदस्य शिवाजी कांबळे, सागर मयेकर, ॲड. अमृत गावडे, सौ. संध्या शि.गावडे, सौ. ममता कांबळे, साधना कांबळे, तसेंच दुर्गवीर प्रतिष्ठानचे सागर टक्के, मयूर विचारे, अर्जुन दळवी, सुरेश उंदरे, संदीप गावडे, कृष्णा सुप्पल, सागर गावडे,विशाल पन्हाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन अशोक चिंचणगी यांनी केले याच दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यासाठी मुख्याध्यापकांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment