नेसरी येथील एस एस हायस्कूलमध्ये माजी आम. तुकाराम कोलेकर यांची जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2023

नेसरी येथील एस एस हायस्कूलमध्ये माजी आम. तुकाराम कोलेकर यांची जयंती साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस.एस.हायस्कूल मध्ये माजी आमदार स्वर्गीय तुकाराम कृष्णाजी कोलेकर  यांची १०४ वी जंयती साजरी करण्यात आली.या जयंतीनिमित्त विद्यालयात क्रांती उत्सवातंर्गत जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शिक्षण समिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोलेकर, माजी प्राचार्य एम. डी. कदम, माजी शिक्षक एच. जी. देसाई, प्रशालेचे प्राचार्य ए. डी. लोहार, उपमुख्याध्यापक एस. जे. कालकुंद्रीकर, पर्यवेक्षक एस. एच. पाटील यासह शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वकृत्व स्पर्धेमध्ये ज्योती कृष्णा कडगावकर, स्कंद शिवकुमार जंगम, श्रीधर मारुती बागडी, लतिका मनोहर गुरव व समीक्षा मधुकर साबळे यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून एस. जे. बुगडे व सौ. जयश्री हुक्केरी यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन वाय. व्ही. तरवाळ यांनी करून आभार मानले.No comments:

Post a Comment