कुदनूर येथील लक्ष्मी पतसंस्था वार्षिक सभेत १५ टक्के लाभांश जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2023

कुदनूर येथील लक्ष्मी पतसंस्था वार्षिक सभेत १५ टक्के लाभांश जाहीर

 

वार्षिक सभेत बोलताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कुदनूर (ता. चंदगड) येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा १० सप्टेंबर रोजी खेळीमेळीत संपन्न झाली. चेअरमन एल. एस. कोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. 

      प्रास्ताविक सचिव एम. एम. जमादार यांनी केले. अहवाल वाचन करताना व्यवस्थापक बाळकृष्ण नागरदळेकर यांनी संस्थेकडे गत आर्थिक वर्षात ५ कोटी  लाख रुपयांच्या ठेवी असून १९ लाख ८४ हजार ४९५ रुपये नफा झाल्याचे सांगितले. सभेत इयत्ता दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त सभासद तसेच आदर्श पोलीस पाटील पुरस्कार विजेते नामदेव लोहार आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश हेब्बाळकर, भीमराव बामणे, निंगाप्पा आंबेवाडकर, कृष्णा मांडेकर, नारायण मांडेकर, बाबुराव जाधव, बाबू मुतकेकर, बाळगोंडा पाटील, परशराम खंदाळे आदींनी सहभाग घेतला. संचालक चंद्रकांत निर्मळकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment