तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका शेतकरी सह. खरेदी- विक्री संघ तुर्केवाडी (ता. चंदगड) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता शिनोळी येथील औद्योगिक वसाहतीतील खत कारखान्यात होणार असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी दिली.
चंदगड तालुका संघाचे कामकाज जिल्ह्यातच नाही तर राज्यातही अनुकरणीय आहे. राज्य शासनाचे दोन पुरस्कार संघाला मिळाले आहेत शिनोळी येथे संघाने स्वतः चा खत कारखाना उभा करून शेतकऱ्यांना अत्यत्प किमतीत खत पुरवठा केला आहे. जीवनात लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंसाठी तुलसी बाजार सुरू करून तो बाजार ऑनलाईन प्रक्रियेने जोडला आहे. १२ कोटी ८० लाखाचे स्वभांडवल व २२ कोटींचे संघाचे खेळते भांडवल आहे. गेल्या
आर्थिक वर्षात संस्थेला ६५ लाखांचा नफा झाला. त्या नफ्यातून संचालक मंडळाने १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली. आहे. मात्र प्रत्यक्षात सभासदांकडून खाद्यतेलाची मागणी होते. ती संघाकडून पुरविले जाते. यावर्षीही लाभांश स्वरूपात खाद्यतेल अपेक्षित आहे. संघ अधिक हायटेक करण्यासाठी सभासदांच्या महत्त्वपूर्ण सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment