गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे चंदगड शहरातून रूटमार्च - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2023

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे चंदगड शहरातून रूटमार्च


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद अनुषंगाने चंदगड पोलीस हद्दीमध्ये चंदगड शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता 20/09/2023 रोजी चंदगड शहरांमध्ये 17.45 वा ते 18.30 यावेळेत रूटमार्च करण्यात आला.

       रूट मार्च हा पोलीस ठाणे -छत्रपती संभाजी चौक- मेन बाजारपेठ - मांड चौक - कैलास कॉर्नर - रवळनाथ गल्ली - जामा मस्जिद- आझाद गल्ली ते छ. संभाजी महाराज चौक असा रूट मार्च काढण्यात आला. रूटमार्च मधे चंदगड पोलीस ठाणे कडील 1 पो नि, 3 पोसई, 18 अंमलदार , एस आर पी एफ प्लाटून 01+24 अंमलदार, होमगार्ड 22 असे एकूण 4 अधिकारी 40 अंमलदार व 22 होमगार्ड सहभागी होते.No comments:

Post a Comment