अर्जुनवाडी येथे २१ रोजी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2023

अर्जुनवाडी येथे २१ रोजी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा  
      अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) यांच्या वतीने खास गणेशोत्सवानिमित्त उद्या गुरुवार दि. २१/०९/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघास रु. ६००१/- तर द्वितीय क्रमांक  विजेत्यास ५००१/- व सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक संघात ७ खेळाडू असतील. यातील एका खेळाडूचे वजन ८० किलो राहील. प्रवेश फी रु. ५००/-  असून अधिक माहितीसाठी 8888978156 व 9594080970 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment