चंदगड / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथील जय हनुमान सेवा संस्थेची १०७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी जय हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन यल्लाप्पा वैजनाथ तरवाळ होते.
प्रास्ताविक माजी चेअरमन वीरूपाक्ष किणीकर यानी करून उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे संचालक पी. एस. नौकुडकर यांनी अभिनंदन ठराव व तसेच देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा व आमच्या संस्थेचे दिवगंत झालेल्या सभासदांच्यासाठी श्रद्धांजली ठराव मांडला. विषय पत्रिकेचे सचिव गणपती बिर्जे यांनी केले.चेअरमन यल्लाप्पा तरवाळ यानी संस्थेचा वार्षिक आढावा सादर करून अहवाल सालात संस्थेला ६ लाख ६९ हजार ९७ रूपये नफा झाल्याचे सांगून सभासदांना सात टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी सभासद एम. एम. कुट्रे, एस. एम. फर्नांडिस, प्रकाश पुजारी, लक्ष्मण जोशीलकर, नागोजी जोशीलकर, नारायण व्हडगेकर, पुंडलिक नांदुडकर, जोतिबा पाटील, संजय कुट्रे, उपाध्यक्ष वैजनाथ मणगुतकर, सटुप्पा दुंडगेकर, निंगाप्पा मोटुरे, भगवान जोशीलकर, प्रकाश जोशीलकर, वसंत सुतार, दुंडाप्पा पुजारी, म्हातू कुट्रे, संचालिका जयश्री जोशीलकर, सुरेखा बिर्जे, सेवक वर्ग विष्णू गणाचारी, राजाराम बिर्जे यासह सभासद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment