मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक सखारामबापू फदाट यांच्या हस्ते ध्वजारोहण - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक सखारामबापू फदाट यांच्या हस्ते ध्वजारोहण

  

बोरगाव बुद्रुक, जिल्हा जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करताना स्वातंत्र्यसैनिक सखारामबापू फदाट.

जालना : सी. एल. वृत्तसेवा 
 देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि मराठवाडा भूमि परकीय राजवटीच्या साखळदंडातुन मुक्त झाली. मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव बुद्रुक (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सखारामजी बापू फदाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
      यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी  घोषणा देत गावातून भव्य रॅली काढून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना स्वातंत्र्यसैनिक सखाराम बापू यांनी निजामाच्या  कुरघोड्या रोखण्यासाठी तसेच मराठवाडा मुक्तीसाठी कसा लढा उभारला...! या इतिहासाला उजाळा दिला. स्वतंत्र्यसैनिक सखाराम बापू यांच्यासारखे रत्न आपल्या गावात जन्माला आले ही आपल्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन सरपंच, उपसरपंच यांनी केले. यावेळी  ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment