मजरे शिरगाव गणेशोत्सव मंडळाकडून गोरगरिबांना शिधावाटप - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2023

मजरे शिरगाव गणेशोत्सव मंडळाकडून गोरगरिबांना शिधावाटप

श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीमती अनिता अशोक कांबळे यांना साहित्य देताना मुख्याध्यापक जयवंत पाटील व मंडळाचे पदाधिकारी 
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
    श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ मजरे शिरगाव, ता. चंदगड यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे गावातील पाच अतिशय गरीब व गरजू कुटुंबाना सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. 
     गेली अनेक वर्षे गणेशोत्सव काळात विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या या मंडळाने यंदाही गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राबवलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे. साहित्याचे वाटप मराठी विद्यामंदिर मजरे शिरगाव चे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
       यावेळी मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष सुनिल गोपाळ सुर्यवंशी सदस्य महादेव सुर्यवंशी, महादेव कुंदेकर, मनोहर वाके, मनोहर गावडे, जोतिबा सुर्यवंशी, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment