चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ऐतिहासिक किल्ले गंधर्वगड (ता. चंदगड) या महसूली गावाला स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर कखरा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे केली आहे.
गंधर्वगड गाव हे ऐतिहासक किल्ले पारगड वसलेले स्वतंत्र महसूल गाव आहे. गांवामध्ये अद्यापपर्यत निवडणुक केंद्र नसलेने बाजुच्या केरवडे गावात निवडणुकीसाठी जावे लागत असून प्रत्येक निवडणुकीत गावातील वयस्कर लोकांना त्याचा त्रास होत आहे. तरी गंधर्वगड गावात येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करा अन्यथा ग्रामस्थ येथून पुढील सर्व निवडणुकीवर बहिस्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर मधुकर शिवाजी साळोखे, अनिल जानबा होडगे, मष्णु सातु यादव, भिवाजी मारुती चांदेकर, सुरेश बाबु धुळप, मारुती धाकलू साळोखे, रावजी मष्णु होडगे, सुरेश भरमु कडलगेकर, अर्जुन बाबु होडगे, बाळू विष्णु यादव, सहदेव चंद्रु कदम, मष्णु रामु आमसकर, चाळोबा जोतीबा सरनोबत, रामाणा रावजी होडगे आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment