चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
खडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील आदर्श विकास सेवा सोसायटीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नारायण लक्ष्मण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे जेष्ठ सभासद धोंडीबा ओमाणा पाटील व संचालक मंडळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
संस्थापक चेअरमन जी. डी. पाटील यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बोर्डाचे अनावरण झाले. चेअरमन कारकीर्द बोर्डाचे उद्घाटन पांडुरंग तुकाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम संस्थेचे दिवंगत सभासद, हितचिंतक आजी, माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, वैज्ञानिक यांना एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सचिव सुरेश पाटील यांनी सभेचे अहवाल वाचन केले. अहवाल सालात संस्थेला 382489.15 रुपये इतका नफा झाला असुन सभासदांना ७% दराने लाभांश देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. अहवाल सालात संस्थेने सभासदांना 9044258 रुपये इतका कर्ज पुरवठा केला असुन आज संस्थेचे भाग भांडवल 4017965 रुपये इतके आहे. तर संस्थेच्या ठेवी 110010 रुपये इतक्या असुन संस्थेची गुंतवणूक 2220075 रुपयांची आहे.
आगामी काळात जागा खरेदी करून संस्थेची स्वतःची इमारत बांधण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. चर्चे दरम्यान पांडुरंग कांबळे, शिवाजी हणमंत पाटील, यल्लापा कृष्णा पाटील व अरुण धाकलू पाटील यांनी प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत ही २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आभार प्रदर्शन शिवाजी नागोजी पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment