चंदगड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या वतीने गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न, सुचनासह विविध विषयावर चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2023

चंदगड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या वतीने गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न, सुचनासह विविध विषयावर चर्चा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने तहसिल कार्यालयात शांतता कमिटी, पोलीस पाटील, सर्व गणेश मंडळ व सर्व खाते प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसिलदार राजेश चव्हाण, पो. नि. संतोष घोळवे,  चंदगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह पोलीस पाटील, डॉल्बी धारक, मंडप डेकोरेशन धारक यांच्या अन्य लोक उपस्थित होते. 

                       बैठकीतील ठळक मुद्दे

१. या बैठकीमध्ये  चंदगड पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखणे,  मंडप व ध्वनी प्रदूषण अधिनियमची अंमलबजावणी करण्याबाबत बैठक झाली. 

२. गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने सर्व सार्वजनिक मंडळांनी संबंधित विभागाच्या सर्व परवानगी घेणे आवश्यक आहेत.

३. गणपती आगमन वेळी सर्व मंडळांनी वेळेत आगमन करून वेळेत प्रतिष्ठापना करावी.

४. अश्लील नृत्यांगना मिरवणुकीमध्ये  नाचवू नयेत.

५. डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. 

६. सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करावा.

७. शासनाचे नियम नुसार योग्य त्या मापाचे मंडप घालावे. रोडवर मंडप घालू नये, मंडप घळणेबाबत स्थानिक प्रशासन यांचेकडून रीतसर परवानगी घ्यावी.

८. वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती करू नये. 

९. मूर्ती प्रतिष्ठापना ठिकाणी दिवसा व रात्रौ असे २४ तास स्वयंसेवक नेमावेत.

१०. स्थानिक प्रशासनाने विसर्जन कुंड केल्या ठिकाणीच विसर्जन करण्यात यावे.

११. विसर्जन ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाऊ नये..

१२. विद्युत रोषणाई बाबत एम एस ई बी यांचेकडून योग्य ती रीतसर परवानगी घ्यावी.

१३. विसर्जन वेळी कोणीही मंडळातील अध्यक्ष सदस्य आणि मद्य प्राशन करून मिरवणूक मधे सहभागी होऊ नये, याची अध्यक्ष यांनी खबरदारी घ्यावी.

१४. मिरवणुकीत वापरण्यात येणारी वाहने ही संबंधित विभागाकडून  तपासून घ्यावीत.

१५. आगमन व विसर्जन मिरवणूक ही वेळेत काढून वेळेत संपवावी..

१५. मिरवणुका रेंगाळत ठेऊ नयेत. 

१६. यासह सर्व मंडळांनी जातीय सलोखा राखावा, सोशल मीडिया माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, स्टेटस प्रसारित करू नये असे कोणी करत असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.

१७. तसेच कोणत्याही इमर्जन्सी साठी डायल वन टू ला कॉल करावा.

        असे आवाहन करून श्री गणेश उत्सव अनुषंगाने मा पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सविस्तर सूचना दिल्या.  


        तसेच प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी ``तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी आयोजित स्पर्धेतील विजयाची निवड करण्याच्या अनुषंगाने सर्व शासन निर्णय बाबत माहिती दिली. डॉल्बीचा वापर करू नका, मंडळा मंडळामध्ये खुन्नस ठेवू नका, इर्षा  करू नका, आगामी गणेशोत्सव सण हा आनंदात, शांततेत व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार पाडण्याबाबत सूचना दिल्या.``

    सर्व सुचनांचे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पालन करुन शांततेत सण साजरा करावा असे आवाहनही यावेळी पो. नि. श्री. घोळवे यांनी केले. 

No comments:

Post a Comment