नेसरी येथील एस एस हायस्कूल मध्ये आजी-आजोबा गौरव दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2023

नेसरी येथील एस एस हायस्कूल मध्ये आजी-आजोबा गौरव दिन उत्साहात

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस. एस. हायस्कूलमध्ये आजी -आजोबा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण समिती संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. अर्चनाताई कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रम संपन्न झाला.

      प्रास्ताविक प्राचार्य ए. डी. लोहार यांनी केले. आजी-आजोबा दिनाचे महत्त्व उपमुख्याध्यापक एस जे कालकुंद्रीकर यांनी केले. या कार्यक्रमाला इयत्ता पाचवी व सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आजी -आजोबा उपस्थित होते .या आजी-आजोबांचे प्रशालेच्या वतीने औक्षण करून श्रीफळ व आहेर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

    त्याचबरोबर त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून अभंग गायन व वादन करण्यात आले. या अभंग व गायनामध्ये एस. ई. सुतार, वाय. व्ही. तरवाळ, एस. जे. कालकुंद्रीकर, धीरज पताडे, सौरभ पाटील, आदित्य तरवाळ, ईशा भिकले, श्रेया देसाई, स्नेहा पांडव, शर्वरी, प्रथमेश पाटील आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.

     यावेळी आजी-आजोबांच्यासाठी संगीत खुर्ची आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रत्ना मारुती नाईक या आजीने संगीत खुर्चीचा मान पटकावला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी-आजोबाचे आरोग्य व पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. व्ही. तरवाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. एच. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment