राजीव गांधी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, ५५.५२ लाखांचा नफा - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2023

राजीव गांधी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, ५५.५२ लाखांचा नफा

कुदनूर येथे राजीव गांधी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना चेअरमन पी. बी. पाटील सोबत मान्यवर संचालक मंडळ
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     कुदनूर (ता. चंदगड) येथील राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ११/९/२०२३ रोजी चेअरमन पी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पाडली. 
     संस्थापक कै. बाळासो कोकितकर यांच्या फोटो पूजनाने सभेची सुरुवात झाली. संचालक प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक नामदेव कोकितकर यांनी अहवाल वाचन केले. चेअरमन पी. बी. पाटील यांनी संस्थेच्या २९ वर्षातील प्रगतीचा आढावा घेताना गत आर्थिक वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल ८८ कोटींच्या वर गेली असून संस्थेला ५५ लाख ५२ हजार ३८१ रुपये नफा झाल्याचे सांगितले. 
     सभासदांना १५ टक्के लाभांश गणेश चतुर्थी पूर्वी देण्याचा निर्णय जाहीर केला. संस्थेने सभासदांकरिता मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन पाटील, प्रा. शहापूरकर, व्यवस्थापक कोकितकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी सेवानिवृत्त व विविध पुरस्कार विजेते सभासद तसेच गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 यावेळी झालेल्या चर्चेत मधुकर आंबेवाडकर, तळजू कोकितकर, रूक्माना पाटील यांनी भाग घेतला. याप्रसंगी उपसरपंच अशोक गवंडी, विष्णू बागिलगेकर, सट्टूप्पा भैरू पाटील, संतराम पाटील, निंगाप्पा माने, अशोक व्हन्याळकर, रवींद्र देसाई, राजाराम सुतार, रघु गावडे, शंकर भेंडुलकर, अर्जुन पाटील, विजया कोकीतकर आदींसह सर्व शाखांचे संचालक, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. झिमाना पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment