कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांचा कोवाड येथे उद्या सेवानिवृत्ती गौरव सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2023

कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांचा कोवाड येथे उद्या सेवानिवृत्ती गौरव सोहळा

 

श्रीकांत पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाडचे मुख्याध्यापक, कालकुंद्री (ता. चंदगड) चे सुपुत्र श्रीकांत वैजनाथ पाटील हे जिल्हा परिषद कोल्हापूर कडील आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती शुभेच्छा गौरव सोहळा मंगळवार दिनांक ३१/१०/२०२३ रोजी आयोजित केला आहे. 

संभाजीराजे छत्रपती यांच्यासमवेत सपत्नीक श्रीकांत पाटील व इतर.

      पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन (श्री मंगल कार्यालय), नेसरी रोड कोवाड येथे दुपारी १२ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सौ. अनिता कल्लाप्पाण्णा भोगण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा आप्पाजी यादव, प्र. मुख्याध्यापक गणपती काशीराम लोहार, केंद्र प्रमुख बी. एस. शिरगे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment