तेऊरवाडी येथे मराठा समाजाचा कँडल मार्च, हजारो लोक रस्त्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2023

तेऊरवाडी येथे मराठा समाजाचा कँडल मार्च, हजारो लोक रस्त्यावर

तेऊरवाडी येथे कॅडल मार्च मध्ये सहभागी ग्रामस्थ

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       तेऊरवाडी (ता. चंदगड) मनाेज जरांगे पाटील याना  पाठींबा देण्यासाठी मराठा समाज एकवटला. यावेळी हजारो युवकांनी कॅडल पेटवून गावातून फेरी काढून पाठींबा व्यक्त केला. यावेळी शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

       या कॅडल मार्चची सुरवात तेऊरवाडी ग्राम पंचायती पासून करण्यात आली. हा मार्च फडेवाडी (नवीन वसाहत) मुख्य नेसरी कोवाड मार्गावरुन गावाततील मुख्य मार्गावरून  हातात.

    पेटत्या कॅडल घेऊन काढण्यात आला. यामध्ये अगदी अंगणवाडीच्या मूलापासून ते वृद्ध स्त्री पुरुष सहभागी झाले होते. मार्चची सांगता ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आली. यावेळी एम. ए. पाटील, बजरंग पाटील, जे. म. पाटील, दयानंद पाटील, एम. बी. पाटील, सरपंच सौ. मनिषा पाटील, महादेव पाटील, राजेंद्र भिंगुडे आदिनी मनोगते व्यक्त केली. यावेळी राजकीय नेत्याना गावबंदिचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

No comments:

Post a Comment