चंदगड / प्रतिनिधी
मराठा आरक्षण कायम स्वरुपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरंगे-पाटील उपोषणाला पाठबळ देण्यासाठी देवरवाडी ता.चंदगड येथे सोमवारी सायं ८ वाजता कँडल मार्च काढण्यात आला. गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली.
मनोज जरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत हे शासन जरंगे पाटील यांची मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत देवरवाडी गावातील मराठा समाज बांधवांनी उद्या पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
या कँडल मार्चचे आयोजन प्रा. नागेंद्र जाधव, संदीप अर्जुन भोगण, प्रवीण पाटील, उमेश भांदुर्गे, यांनी केले तर यावेळी उपसरपंच गोविंद आडाव, सेवा सोसायटी चेअरमन शंकर भोगण, उद्योजक विजय भांदुर्गे, उमेश भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, पुंडलिक दीक्षित, संजय भोगण, प्रकाश करडे, अमोल भोगण, विनोद मजुकर, वैजनाथ भोसले, महेश जाधव, अमृत सुरेश भोगण, प्रमोद भोगण, वैभव केसरकर, शंकर गुंडप, सुरेश सोमना भोगण, मष्णू वर्पे सह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा नागेंद्र जाधव, संदीप भोगण, संघर्ष प्रज्ञावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगळवार सकाळ पासून साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. या बाबतचे निवेदन ई मेल द्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चंदगड यांना पाठविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment