चंदगड / प्रतिनिधी
अखिल भारतीय मुद्रांक संघटनेच्या चंदगड तालुका शाखेच्या वतीने विविध मागण्यासंबंधी चंदगड तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय मुद्रांक विक्री बंद करून धरणे अंदोलन करण्यात आले.
मुद्रांक विक्रेते ३० ते ४० वर्षा पासुन मुद्रांक विक्री व दस्त लेखनाचा व्यवसाय करीत आहेत.मुद्रांक विक्रेत्यांना यापूर्वी ३०,००० रू.पर्यंतचे मुद्रांक विकता येत होते पण काही वर्षा पुर्वी शासनाने ही मर्यादा कमी करून ती ५०० रु.पर्यंत आणुन ठेवली आहे. शासनाचा निर्णय मान्य करून १०० रु.पर्यंतचे मुद्रांक विक्री करून उदर निर्वाह करीत आहोत,पण सध्या संपूर्ण मुद्रांक विक्रेत्यांकडून होणारी मुद्रांक विक्रीच बंद करून ती बँका मार्फत करण्याचा शासनाचा विचार केला आहे.
मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांचे सरासरी वय ३५ ते ४५ इतके आहे.जर शासना कडून मुद्राक विक्री बंद झाली तर महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असून हजारो कुटुंबे उघडयावर पडणार आहेत.आम्हा व्यावसायीकांचे वयोमान पाहता भविष्यात दुसरा कोणताही व्यवसाय करणे शक्य होणार नसून या व्यवसायावर प्रत्यदक्ष, अप्रत्यक्ष रित्या अवलंबुन असणा-या सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम होणार आहे. राज्यातील मुद्रांक विक्री या पुढे ही कायम स्वरूपी मुद्रांक विक्रेते यांच्या कडूनच कायम ठेवून खालील आमच्या मागण्याचा सहानुभुती पुर्वक विचार होवून मागण्या मान्य करण्यात कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे.मुद्रांक विक्रीचे कमीशन तीन टक्के वरून दहा टक्के करण्यात यावे,मुद्रांक विक्रीचा कोटा हा पूर्वी प्रमाणे ३०,००० रु इतका करावा,सध्या अस्तित्वात असलेली स्टॅम्प विक्री कायम स्वरूपी बंद होणार असलेची चर्चा असून ती बंद न होता ती कायम स्वरूपी सुरू राहावी,परवाना धारक मुद्रांक विक्रेते तथा दस्त लेखनिक यांना बसण्यासाठी कायम स्वरूपी शासकीय जागा उपलब्ध करून दयावी,एखादया मुद्रांक विक्रेताचा दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना मुद्रांक विक्री परवाना वारसा हक्काने मिळावा,भविष्यात फ्रेंकिंग मशीनचा वापर होणार असल्यास प्राध्यान्य क्रमाने मुद्रांक विक्रेते यांना सदरील मशीन देणेत यावी, आदी मागण्यांसाठ चंदगड तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
निवेदनावर पी. एस. पाटकर, राजाराम मुदाळे, महादेव भोसले, इकबाल मुल्ला, पिराजी भोगण, संजय गावडे, सुरेश केसरकर, पिराजी रेडेकर, सदानंद भोसले, रवी गुरव, आनंद कंग्राळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment