आमदार राजेश पाटील उतरले आंदोलनाच्या मैदानात, विशेष अधिवेशन बोलविण्याची केली मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2023

आमदार राजेश पाटील उतरले आंदोलनाच्या मैदानात, विशेष अधिवेशन बोलविण्याची केली मागणी

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       आज मुंबई मंत्रालय जवळील गांधी स्मारक येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्याकरिता सर्वपक्षीय आमदारानी पाठिंबा दिला यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यानी थेट या आंदोलनाच्या मैदानात उडी घेतल्याने संपूर्ण मतदार संघातील सकल मराठा  समाजाकडून आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे. लवकरच मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात  विशेष अधिवेशन बोलवावे या करीता राज्यपाल ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे मागणी करणार असल्याचे यावेळी आमदार राजेश पाटील यानी यावेळी बोलताना सांगीतले.

      एक मराठा, लाख मराठा हे ब्रीद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाचे  आंदोलन चालू आहे. चंदगड तालूक्यातही या आंदोलनाने तीव्र पडसाद उमटत आहेत. याचा परिणाम म्हणून राजकीय नेत्याना गाव प्रवेश बंद करण्यात आला आहे. आमदार व खासदाराना तालूका बंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत स्वतः मराठा असणारे  आमदार राजेश पाटील सात्ताधारी पक्षात असल्याने त्यांचीभूमिका काय राहणार? हा सर्वाना मोठा प्रश्न पडला होता. पण आज आमदार पाटील अजित पवार गटाचे इतर पाच आमदार, कॉंग्रेसचे दोन व उद्धव ठाकरे गटाचे दोन अशा आमदारासह थेट मराठा आरक्षण आंदोलनात उतरल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या गेल्या. आज मुंबई मंत्रालय जवळील गांधी स्मारक येथे या सर्वपक्षिय आमदारानी आंदोलनाला पाठींबा देत लवकरच विशेष अधिवेशन बोलवावे याकरीता राज्यपाल व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment