चंदगड / सी.एल. वृतसेवा
नांदवडे-शेवाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेला नांदवडे-शेवाळे गावचे जाहीर समर्थन दिले आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय नेते नांदवडे-शेवाळे गावात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. नांदवडे-शेवाळे ग्रुप ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.
मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेते नांदवडे-शेवाळे गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एकच पक्ष मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाला सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा पूर्णपणे पाठींबा दिला आहे.
हा ठराव ग्रामपंचांयतीच्या मासिक सभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावाला सुचक सौ. संजीवनी संपत पेडणेकर यांनी तर अनुमोदन सौ. अस्मिता सुधाकर पाटील यांनी दिले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच एन. एस. पाटील, सदस्या सौ. संगीता गावडे, सौ. संजीवनी पेडणेकर, सौ. अस्मिता पाटील, सौ अश्विनी गावडे, सौ. संजीवनी सुतार, परशुराम फडके, विद्यानंद सुतार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment