चंदगड येथे रविवारी सकल मराठा समाजाचा मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2023

चंदगड येथे रविवारी सकल मराठा समाजाचा मेळावा

 


 चंदगड / प्रतिनिधी

          चंदगड येथे सकल मराठा समाजाचा मेळावा देव रवळनाथ मंदिराच्या सभागृहात रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता  आयोजित केला आहे . मराठा समाज महाराष्ट्रातील प्रमुख समाज असून शेती हा मुख्य व्यवसाय आजही आहे . शिक्षण आहे पण नोकरी नाही आणि शेती पिकत नाही. या दृष्टचक्रात मराठा तरुण अडकला असून त्याचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. 

    समाजातील इतर घटकांप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. या न्याय मागणीसाठी मराठा समाज गेली कित्येक वर्षे शांततेच्या मार्गाने लढा देतो आहे. आपापसातील मतभेद विसरून सर्व समाज बांधव एकत्र येत असून मनोज जरांगे - पाटील यांच्या आमरण आंदोलनामुळे समाज जागृतीने वेग पकडलेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर चंदगड शहरातील मराठा समाज बांधवानी आपले संघटन मजबूत करण्याचे ठरविले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी तसेच चंदगड शहर मराठा समाज कार्यकारिणी निवड करण्यासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मराठा समाज मेळावा आयोजित केला आहे. मराठा बंधू - भगिनींनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment