पोलीस निरीक्षक नितीन सावंत |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पोलीस ठाण्याच्या नुतन पोलिस निरीक्षक पदी नितीन ताराकांत सावंत रूजू झाले आहेत. काल त्यांनी चंदगड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारला. चंदगड पोलिस ठाण्याचा कार्यभार असणारे पो. नि. संतोष घोळवे यांची जिल्हा पोलीस मुख्यालयात तडकापडकी बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्याजागी श्री. सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. सावंत यांचे मुळ गाव पाटण (जि. सातारा) असून त्यांच्या नोकरीची सुरवात मुंबई येथून झाली आहे. ठाणे, कराड, कराड, फलटण, सातारा, अहमदनगर, बीड, कणकवली, देवगड आदी ठीकाणी त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. चंदगड तालुक्यात अवैद्य धंद्याना थारा देणार नाही असे सांगून कामानिमित्त येणार्या नागरिकांनी मध्यस्थाकरवी न येता आपल्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment