निर्भय सहजीवन ही समानतेची भूमिका महत्वाची - डॉ. सुनीता कांबळे |
चंदगड / प्रतिनिधी
बुध्दी, स्पर्धा, साक्षरता, प्रश्न, हे प्राचीन काळात होते. माञ त्यांना दु्यम स्थान होते. आधुनिक काळात सावित्री बाई नी शिक्षव्यवस्थेतील बदल आणि साक्षरतेचे महत्व विशद केले. संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. स्त्री पुरूष समांतर पातळीवर माणूस महत्वाचा. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुनिता कांबळे (कोवाड) यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 'स्त्री पुरुष समानता' या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते.
प्रारंभी प्रा. पी. ए. पाटील यांनी प्रास्तविक केले. उपस्थित मान्यवर यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. डी. अजलकर यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. आभार कु. श्रुती पाटील यांनी मानले. यावेळी प्रा. अनंत कलजी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment