चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)
चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या २२ ग्रामपंचायतीपैकी आंबेवाडी, मिरवेल-पारगड-नामखोल, बुझवडे या तीन ग्रामपंचायती तर शिवनगे व जट्टेवाडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले.तर ३१ सदस्य बिनविरोध निवडून आले. अर्ज माघारीच्या दिवशी जेव्हढ्या जागा तेव्हढेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे आज अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले.
बिनविरोधच्या रात्री अनेक खलबत्ते झाली. इच्छुकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. पण यामध्ये प्रामुख्याने भाऊबंदकी आणि वैयक्तीक वाद आडवे आले आणि निवडणुका लागल्या. गांवनिहाय उमेदवारांची संख्या कंसात, सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार पुढील प्रमाणे आंबेवाडी, मिरवेल-पारगड-नामखोल, बुझवडे (बिनविरोध), आमरोळी (४) (२३), भोगोली (३),(१२) गणूचीवाडी (२) (१३), जट्टेवाडी (सरपंच बिनविरोध), (१४), कडलगे खुर्द (२) (१४), कलिवडे (३)(१९), कानुर खुर्द (२)(१७), कोदाळी(५)(१६), कुरणी (२)(१८), लाकुरवाडी (२)(१५) माणगाव (२) (२९), मुरकुटेवाडी (२)(१४) सडेगुडवळे (२) (१३), शिरोली सत्तेवाडी(३)(१२), शिवनगे (सरपंंच बिनविरोध), तांबुळवाडी(२)(१५), तुर्केवाडी (२)(२७), उमगाव(२)(१८), उत्साळी(२)(१४).
निवडणुक लागलेल्या २२ ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी एकूण ९८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ५१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत तर ४७ उमेदवार सरपंचपदासाठी निवडणुक रिंगणात आहेत. सदस्यपदासाठी एकूण ५०८ उमेदवारांन अर्ज भरले होते. अर्ज माघारी दिवशी १७१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर निवडणुक रिंगणात ३३७ उमेदवार आपले नशिब आजमणावर आहेत.
No comments:
Post a Comment