चंदगड येथे एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा गडहिंग्लजचे एसबीएम गायतोंडे यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2023

चंदगड येथे एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा गडहिंग्लजचे एसबीएम गायतोंडे यांच्या हस्ते शुभारंभ

 

चंदगड येथे गजानन राऊत यांच्या एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा शुभारंभ करताना गडहिंग्लजचे एसबीएम विनायक गायतोंडे, शेजारी गजानन राऊत.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

विमा प्रतिनिधी भरती, प्रशिक्षण केंद्र व हप्ता भरणा केंद्र या एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा शुभारंभ गडहिंग्लजचे एसबीएम विनायक गायतोंडे यांच्या हस्ते झाला. कार्यालयाचे सर्वेसर्वा चेअरमन क्लब मेंटर एम. डी. आर. टी. गजानन बाबुराव राऊत यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व प्रास्ताविक केले. 

       यावेळी गडहिंग्लजचे एसबीएम विनायक गायतोंडे म्हणाले, ``चंदगड येथे सुरु केलेल्या या प्रशिक्षण केंद्र, वीमा प्रतिनिधी भरती केंद्राचा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा. आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी विमा विक्री हा उत्तम पर्याय आहे. नोकरीच्या मागे न धावता स्वत: लोकांना वीमा संरक्षण देत स्वत: आर्थिक स्थेर्य प्राप्त करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. गजानन राऊत यांनी चंदगड येथे सुरु केलेल्या विमा प्रतिनिधी भरती, प्रशिक्षण केंद्र व हप्ता भरणा केंद्र यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.``

       यावेळी चंदगडचे बीएम किरण औचिते, आजरा बीम सदानंद गायकवाड, चंदगड एओ चंद्रशेखर बीचगत्ती व शेखर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लजचे एलआयसीचे पदाधिकारी, कर्मचारी व विमा प्रतिनिधीही उपस्थित असतील. 

No comments:

Post a Comment