अलतगा खडीमशीन मैदानावर उद्या रविवार २९ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2023

अलतगा खडीमशीन मैदानावर उद्या रविवार २९ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानकालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त उद्या रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता अलतगा, (तालुका बेळगाव) खडीमशीन नजीकच्या मैदानावर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आल्याची माहिती बेळगाव जिल्हा महर्षी वाल्मिकी कुस्तीगीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बाळाप्पा अष्टगी यांनी दिली आहे.

   कंग्राळी अगसगा रोड मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै नागराज बीसीडोनी विरुद्ध पै मनीष कुमार हरियाणा यांच्यात रंगणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै कीर्ती कुमार पुणे विरुद्ध शांताराम सांगली, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शुभम भोसेकर पुणे विरुद्ध प्रेम जाधव कंग्राळी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी विरुद्ध विशाल इचलकरंजी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती गिरीश चिकबागेवाडी विरुद्ध पृथ्वी पाटील कंग्राळी खुर्द, सहाव्या क्रमांकाची कुस्ती गजानन सांगली विरुद्ध हर्षद दानवे इचलकरंजी, सातव्या क्रमांकाची कुस्ती राजू डागेकर शिनोळी विरुद्ध महादेव धरेण्णवर, आठव्या क्रमांकाची कुस्ती निरंजन यळळूर विरुद्ध शुभम कंग्राळी खुर्द यांच्यात होणार असून या शिवाय 57 चटकदार कुस्त्या कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणार आहेत. जंगी मेंढ्यासाठी आकर्षण असलेली कुस्ती पै अजित चौगुले कर्नाटक चॅम्पियन विरुद्ध पै ओमकार राशिवडे महाराष्ट्र चॅम्पियन यांच्यामध्ये होणार आहे. 

     मैदानाचे उद्घाटन कर्नाटकचे बांधकाम मंत्री तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जार्किहोळी यांच्या हस्ते युवा नेता राहुल जारकीहोळी यांच्यासह आमदार असिफ शेठ, मलगोंडा पाटील, अरुण खटांबळे, संजय सुंठकर, पिराजी पाटील, सतीश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील कुस्ती शौकिनांनी मैदानाचा लाभ घेण्याचे आवाहन सुरेश अष्टगी व मंडळाचे युवा कार्यकर्ते किरण अष्टगी तसेच बेळगाव जिल्हा महर्षी वाल्मिकी कुस्ती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. कुस्ती मैदानाचे धावते समालोचन कृष्णात चौगुले राशिवडे व मुख्याध्यापक परशुराम पाटील कंग्राळी खुर्द हे करणार आहे.


No comments:

Post a Comment