बसुर्ते शाळेच्या शिक्षिका गजाताई जाधव- निट्टूरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2023

बसुर्ते शाळेच्या शिक्षिका गजाताई जाधव- निट्टूरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

 

बसुर्ते येथे शाळा व्यवस्थापन समिती बसुर्ते व ग्रामपंचायत उचगाव यांच्या वतीने शिक्षिका श्रीमती गजाताई जाधव यांचा सत्कार करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        बसुर्ते (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यापिका श्रीमती गजाताई धोंडीराम जाधव- निट्टूरकर, या २८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त त्यांचा ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती बसुर्ते, तसेच उचगाव- बसुर्ते ग्रामपंचायत च्या वतीने बसुर्ते येथे सत्कार व भावपूर्ण निरोप पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश नाईक होते. प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत उचगावच्या अध्यक्षा सौ. मधुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, जयसिंगपूर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुजाता काटे, गौतम काटे उपस्थित होते. 

      स्वागत मुख्याध्यापिका एस. जी. ताशिलदार यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षिका गजाताई जाधव- निट्टूरकर व त्यांचे पती सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वाय आर निट्टूरकर ( रा. कोवाड, ता. चंदगड) दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नेताजी बेनके, दीपक गडकरी, दत्ता बेनके, रवींद्र हुंदळेवाडकर, सुरज सुतार यांच्यासह चंदगड तालुक्यातून माजी केंद्रप्रमुख वसंत जोशीलकर, डी आय पाटील, प्रल्हाद देसाई, कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आदींसह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आर. डी. पाटील व नामदेव पाटील यांनी केले. सौ. एस. एन. पाटील यांनी आभार मानले. श्रीमती जाधव या वीस वर्षे बसुर्ते शाळेत अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या तथापि सेवानिवृत्तीपूर्वी शेवटचे दोन महिने त्यांची तुरमुरी (ता. जि. बेळगाव) येथे बदली झाली होती. त्यामुळे उचगाव परिसरातील शाळांच्या वतीने त्यांचा तुरमुरी येथे मागील आठवड्यात सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न झाला होता. तथापि बसुर्ते ग्रामस्थ व शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावात त्यांचा पुन्हा एकदा आग्रहाने भावपूर्ण सत्कार घडवून आणला. ही श्रीमती जाधव यांच्या शैक्षणिक कार्याची पोचपावतीच म्हणावी लागेल.

 

No comments:

Post a Comment