संतोष घोळवे |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे याची कोल्हापूर पोलिस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर साडे हजारांच्या लाचेची मागणी केल्याने अटकेची कारवाई झालेल्या चंदगड पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल राजीव शामराव जाधव यास रविवारी निलंबित करण्यात आले. दरम्यान, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांना चंदगड येथून तूर्तास पोलिस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. लाचखोरी आणि काळे धंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठीशी घातल्याचे निदर्शनास आल्यास अजिबात गय केली जाणार नाही. संबंधितांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा सज्जड इशारा दिला. ज्या ठिकाणी मटक्यासह जुगारी अड्डे आढळून येतील, तेथील प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल, सध्या चंदगड पोलिस ठाण्याचा कार्यभार मंडळ पोलिस निरीक्षक अली मुल्ला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
चंदगड तालुक्यात चोरी छुपे मटका सूरू
चंदगड तालुक्यात चंदगड सह हलकर्णी फाटा, पाटणेफाटा कारवे, शिनोळी, माणगाव रामपूर आदी गावात चोरी छुपे मुंबई-कल्याण नावाचा मटका जोरात सूरू असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment