तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रेरणेतून व माजी प. स उपसभापती विद्याधर गुरबे यांच्या सहकार्यातून तेज कामगार संघटना नेसरी (ता. गडहिंग्लज) यांच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व स्मार्ट कार्ड चे वाटप स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कै. काशीबाई दळवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भिकाजी दळवी, तंटामुक्त अध्यक्ष मजिद वाटंगी, बाजार समिती संचालक रामदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीट, शिप्पूर तर्फ नेसरी सरपंच सचिन गुरव, बटकणगले सरपंच रामचंद्र कुंभार, हेबाळ-जळद्याल माजी सरपंच उत्तम नाईक, डोनेवाडीचे उपसरपंच रंगराव नाईक, विलास नाईक, महिंद्र पाटील, सागर नांदवड़ेकर, नेसरी भागातील ग्रामपंचायत सदस्य , टीम सतेज चे सर्व पदाधिकारी, तेज संघटनेचे अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण, संयोजक स्वप्निल देसाई, संजय दळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, बांधकाम संघटना कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment