चंदगड एस टी डेपोच्या ४ लाल पर्‍या गायब, प्रवाशी आंदोलनाच्या तयारीत - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2023

चंदगड एस टी डेपोच्या ४ लाल पर्‍या गायब, प्रवाशी आंदोलनाच्या तयारीत

 


तेऊरवाडी / एस. के. पाटील

     अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर चंदगड एस टी डेपोला नविन १० एस टी बसेस मिळाल्या. आता लगेच जुन्या पण लांब पल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिषय चांगल्या ४ लालपऱ्या दुसऱ्या डेपोला देण्यात आल्याने प्रवाशी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

     चंदगड डेपोकडे अनेक दिवसांच्या मागणी नंतर, अँड. संतोष मळवीकरांच्या आंदोलनानंतर व आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाने १० नविन हिरकणी चंदगड डेपोत हजर झाल्या. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या नवीन गाड्यांचे स्वागत करण्यात आले. या बस लांब पल्यासाठी वापरण्यात येत आहेत. पण याच मार्गावर धावणाऱ्या जून्या लाल चार  बस इतर डेपोकडे वर्ग करण्यात आल्याने प्रवाशी अडचणीत आले आहेत . चंदगड ते कोल्हापूर लाल परी  तिकिट दर 160 रुपये तर हिरकणी दर 210 रुपये असा 50 रुपयांचा फरक आहे. तसेच हिरकणी बसला विद्यार्थी पास चालत नाही. चंदगड तालुक्यात पासधारी विद्यार्थी संख्या अधिक आहे . यामुळे काही प्रवाशी व विद्यार्थी वर्गाची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये MH14 BT 3771, MH14 BT 4046, MH11 T 9290 व MH13 CU 7535 या लालपरी अन्य आगारांना वर्ग करण्यात आल्या. अतिषय चांगल्या आसणाऱ्या या गाडया अन्य डेपोकडे गेल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गाडया असत्या तर  यापूर्वी बंद करण्यात आलेल्या मार्गावर फेर्‍या चालू करणे सोपे झाले असते. आगार व्यवस्थापकानी याचा विचार करून या गाड्या परत चंदगड डेपोत घ्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चर्चा प्रवाशांतून चालू आहे.

No comments:

Post a Comment