रवळनाथ'तर्फे आदर्श शिक्षिका सरिता नाईक यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2023

रवळनाथ'तर्फे आदर्श शिक्षिका सरिता नाईक यांचा सत्कार

 

श्री रवळनाथ'तर्फे चंदगड येथे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ. सरिता नाईक यांचा सत्कार करताना शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर शेजारी संस्थेचे सीईओ मायदेव यांच्यासह शाखा सल्लागार प्रा. आर. एन. साळुंखे, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड,शाखाधिकारी किरण कोडोली आदी 

चंदगड / प्रतिनिधी 

         कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिरोली ( ता . चंदगड ) विद्यामंदीरच्या शिक्षिका सौ. सरिता नाईक (रामपूर)यांचा श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेच्या चंदगड शाखेत शाखा चेअरमन सौ.पुष्पा नेसरीकर यांच्याहस्ते हा सत्कार झाला. 

       यावेळी रवळनाथचे सीईओ डी के मायदेव म्हणाले, संस्थेने स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करते. त्यामुळे संस्थेने अप्लावधीतच सहकारात विश्वासार्हता निर्माण केली आहे. सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सौ. सरिता नाईक म्हणाल्या, गेल्या चार वर्षात दिड कोटींचा निधी मिळवून शाळा अद्ययावत सुविधांनी युक्त बनवली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत जिल्हापातळीवर मिळविलेले यश त्यामुळेच जिल्हा परिषदेने आपल्या कामाची दखल घेवून हा पुरस्कार दिला आहे. ' रवळनाथ' सारख्या नामवंत संस्थेनेही माझा सन्मान केला याचा मला अभिमान आहे. याप्रसंगी शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. शाखा सल्लागार प्रा. आर. एन. साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रवळनाथ'चे जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड यांनी सुत्रसंचलन केले. शाखाधिकारी किरण कोडोली यांनी आभार मानले. यावेळी सतिश निर्मळकर मारुती जाधव, श्रीकांत पाठक, सौ. गडकरी, यांच्यासह 'रवळनाथ'चे शाखा सल्लागार, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment