हलकर्णी महाविद्यालयात कवी ना. धो.महानोर विशेषांकाचे प्रकाश
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने कविवर्य ना. धो. महानोर विशेषांक या भितीपत्रकाचे प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत प्रा. अशोक दास यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रारंभी प्रास्ताविक डॉ. अनिल गवळी यांनी केले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महानोरांच्या काव्य विशेषांकाचे प्रा. दास यांनी कौतुकाचे उद्गार काढले. विद्यार्थ्यांच्या अभिरुचीला वाव देणारे असे छोटे छोटे घटक महत्त्वाचे आहेत. असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंकिता पाटील यांनी केले. तर आभार कुमारी वैष्णवी शिंदे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment