प्रकाश गोविंद पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
घाटकरवाडी (ता. आजरा) येथे हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (वय वर्ष ५२, रा. गवसे, ता. आजरा) हे ठार झाले. हि घटना शनिवारी घडली.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, वन विभागाने आज हत्तीला हुसकाऊन लावण्यासाठी घाटकरवाडी जंगल परिसरात मोहीम आखली होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सदर मोहीम राबवत असताना ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे ५० मीटर पर्यंत हत्तीला हुस्काऊन लावले होते. ग्रामस्थ पुढे गेले असता अचानक झुडपातून हत्ती परत माघारी फिरला व त्याने पाटील यांना सोंडेत धरून भिरकावले व पोटावर पाय दिला. त्यानंतर अन्य ग्रामस्थांच्या पाठीमागे तो लागला. हत्ती मागे लागतील वन कर्मचारी व ग्रामस्थांनी तिथून पळ काढला. त्यानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेला.दरम्यान पाटील यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. गेली दहा वर्षे हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असतानाच आज वन विभागाच्या कर्मचाऱ्यालाच मृत्यूला सामोरे जावे लागल्याने आता तरी हत्तीचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment