स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची' - जॉर्ज क्रूज - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2023

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची' - जॉर्ज क्रूज

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        दैनंदिन वाचन आणि ग्रंथ वाचन, इतिहास या सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे. कोणत्याही गोष्टीसाठी समर्पण आणि तपश्चर्या खूप महत्त्वाची. एखादे काम वाहून घेऊन करणे म्हणजे त्या कामाच्या पूर्तते जवळ जाणे होय. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा.  इंग्रजी, विज्ञान, गणित, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र,  भूगोल या  विषयांची वारंवार होणारी उजळणी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची असते.' असे प्रतिपादन विजयश्री फाउंडेशन, कोल्हापूरचे जॉर्ज क्रूज यांनी केले. 

       ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे आयोजित स्पर्धा परीक्षा यशदा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय पाटील (उपाध्यक्ष, दौलत विश्वस्त संस्था) हे होते.

         प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्ष संवर्धन संदेशाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. पी.ए.बोभाटे यांनी केला करून दिला . स्वागत स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा.सचिन शेळके यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जॉर्ज क्रूज, संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी.डी. अजळकर, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे उपस्थित होते.  अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, 'महाविद्यालयातून स्पर्धा परीक्षा द्वारा विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून पुढील काळात महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश सुतार यांनी केले तर आभार प्रा. मनोज जांबोटकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment