कष्ट करणारे विद्यार्थीच यशस्वी होतात - अर्जुन पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2023

कष्ट करणारे विद्यार्थीच यशस्वी होतात - अर्जुन पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
       सध्याच्या युगात विद्यार्थी  मोबाईल अन टिव्ही मध्ये  गुरफटत चालला आहे. अभ्यास करणे म्हणजे त्याना मोठे संकट वाटू लागले आहे. पण या सर्वां पासून अलिप्त राहून जे विद्यार्थी अपार कष्ट करतात तेच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात असे विचार अर्जुन पाटील यांनी व्यक्त केले.
     श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी -बुझवडे  इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना अर्जुन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. हरेर होते.
       प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात  आले. यानंतर १० वी विद्यार्थी प्रगतीचा आढावा वर्गशिक्षक  टि. बी. गावडे यानी घेतला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रगतिसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये मधूकर गावडे, प्रल्हाद गावडे, संतोष गावडे, शामराव लाड, निंगोजी गावडे आदि पालकांनी भाग घेतला. अध्यक्षिय मनोगत एस के हरेर यानी व्यक्त केले. या कार्यक्रमाला वाय बी पाटील,  एस. एस. नाईक, आर. टी. गिलबिले यांच्यासह बुझवडे, कुरणी, धामापूर, मोरेवाडी येथील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
      प्रास्ताविक टि. बी. गावडे यांनी केले. सूत्रसंचालन ए. ए. आंबी यानी केले तर आभार  वाय. बी. पाटील यानी मानले.

No comments:

Post a Comment