राजगोळी खुर्द येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2023

राजगोळी खुर्द येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्याचंदगड / प्रतिनिधी
        राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कु सानिका दत्तु भास्कळ (वय १६ वर्ष १ महिना २३ दिवस) असे मयत मुलीचे नाव असून ही घटना मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. कु. सानिका भास्कळ हिने मंगळवारी आपल्या घरात कोणी नसल्याचे हॉलमधील फॅनला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी मयताचे वडील दत्तू भास्कळ यांनी कोवाड पोलिसात दिली आहे अधिक तपास पो. हे. काॅ सरबंळे करत आहेत.

No comments:

Post a Comment