पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ११८ वा पुण्यतिथी उत्सवाला ३० ऑक्टोबरपासून प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2023

पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ११८ वा पुण्यतिथी उत्सवाला ३० ऑक्टोबरपासून प्रारंभचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ११८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा सोमवार दि. ३० ऑक्टोबर ते बुधवार दि. १ नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.

      दि. ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता श्रीपंतवाडा, समादेवी गल्ली बेळगाव येथून प्रेमध्वजाची मिरवणूक निघणार आहे. दुपारी दोन वाजता मिरवणूक श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील पंतवाड्यात पोहचणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्रीपंतवाडा येथून प्रेमध्वज मिरवणूक सुरू होणार असून रात्री आठ वाजता प्रेमध्वजारोहणाने उत्सवास प्रारंभ होणार आहे. दि. ३१ रोजी पहाटे पाच वाजता श्रीपुण्यस्मरण कार्यक्रम होईल.

       त्यानंतर गावातील पंतवाड्यातून पालखीची मिरवणूक निघून दुपारी आमराईतील श्रीपंतस्थानी येईल. त्यानंतर पुन्हा रात्री आठ ते १२ पर्यंत पालखी सेवा होईल. बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा श्रींचा महाप्रसाद होईल. दुपारी तीन ते पाचपर्यंत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे. सर्व भक्तांनी उत्सवाचा लाभ घ्यावा असे अवाहन श्री दत्त संस्थान, पंतबाळेकुंद्री उत्सव समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment