अभियंत्याचा पुणे येथे ट्रकने धडक दिल्याने अपघाती मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2023

अभियंत्याचा पुणे येथे ट्रकने धडक दिल्याने अपघाती मृत्यू

संदेशकुमार आनंदा खेडेकर

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

          मूळचा चिमणे (ता. आजरा) येथील व सध्या हाळलक्ष्मीनगर, खोराटे  कॉलनी, गडहिंग्लज येथील रहिवासी संदेशकुमार आनंदा खेडेकर (वय - 32) याचा पुणे येथे बुधवार दि. 25 रोजी सकाळी नऊ वाजता दुचाकी वरून प्रवास करत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या व सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सदर घटना  बुधवारी सकाळी कात्रज जवळील नवले ब्रिजवर घडली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

       संदेशकुमार खेडेकर यांचे शिक्षण बी ई पर्यंत झाले असून पुणे येथे एका कंपनीत नोकरी करत होते. सकाळी घरातून कामावर जात असताना सदर अपघात घडला. करंबळी (ता. गडहिंग्लज)  विद्यामंदिरच्या निवृत्त सहाय्यक शिक्षिका कुसुम रेडेकर व निलजी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी विद्या मंदिरचे निवृत्त मुख्याध्यापक आनंदा खेडेकर यांचा तो सुपुत्र होय. हिडदूगी (ता. गडहिंग्लज) येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे यांचा तो भाचा होय.

No comments:

Post a Comment