बुझवडे येथील शरदचंद्रजी विद्यालयात विविध उपक्रमानी कलाम यांचा जन्मदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2023

बुझवडे येथील शरदचंद्रजी विद्यालयात विविध उपक्रमानी कलाम यांचा जन्मदिन साजरा

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची  जयंती, वाचन प्रेरणा दिन आणि हात धुवा दिन  बुझवडे (ता. चंदगड) येथील श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. हरेर होते.

     याप्रसंगी प्रथम डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाचन व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यालयाचे विज्ञान शिक्षक ए. ए. अंबी  यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ हात धुतल्याचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर एस. एस. नाईक यांनी वाचनाचे महत्त्व आणि अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती दिली. स्नेहल गावडे या विद्यार्थिनिने मनोगत व्यक्त केले.  अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक एस. के. हरेर यांनी केला. प्रास्ताविक टी. बी. गावडे यानी केले. सूत्रसंचालन ए. ए. अंबी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  वाय. बी. पाटील यांनी मांनले. याप्रसंगी रवि गिलबिले यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment