वाघाच्या हल्यात बैल ठार - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2023

वाघाच्या हल्यात बैल ठार


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
आजरा तालूक्यातील आवंडी क्र 3 येथे शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी  येथील शेतकरी सोनू बाबू कोकरे हे रहिवाशी नेहमी प्रमाणे गुरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले  होते. गुरे चारत असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या कळपांमधे पट्टेरी वाघ शिरला या  वाघाने अचानक  या गुरांच्या कळपावर हल्ला केला. या कळपामध्ये   सोनू कोकरे यांचे बैल देखील होते. यातील एका बैलावर या वाघाने  झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्व जनावरे भेदरून  सैरावैरा पळत सुटली. एका बैलावर वाघाने घातलेली  झडप पाहून  पळत जाणाऱ्या इतर दोन बैलांनी परत फिरून  त्याक्षणी  त्या वाघावर हल्ला चढवला. यावेळी झालेल्या झटापटीत एक बैल मात्र ठार झाला. या घटनेमुळे आजरा तालुक्या जंगली भागातील वाघाचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.No comments:

Post a Comment