गांधी जयंती निमित्त बोलताना प्राचार्य एन. डी. देवळे
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५४ वी व लालबहाद्दूर शास्त्री यांची ११९ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
''समाजाला आज गांधी विचारांची आणि आचारांची गरज आहे. गांधी वाचल्याशिवाय गांधी समजत नाही. गांधीनी जगाला अहिंसेचे शस्त्र दिले . ''असे प्रतिपादन प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी. एस. चांदेकर यांनी केले.
'गांधीच्या जीवनातून कार्यपध्दतीतून, आचार विचारातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजीची दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती. आपला परिसर, गाव, देश स्वच्छ करणे हीच खरी गांधी जयंती आहे ' असे मत प्रा. एस. एम. निळकंठ यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा. ए. एस. धायगुडे, प्रा. एस. ए. शेख, प्रा. एन. डी. हदगल, व्ही. टी. पाटील, टी. टी. बेरडे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, टी. व्ही. खंदाळे, पुष्पा सुतार, शरद हदगल इ. शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे तर आभार प्रा. व्ही. बी. गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment